धक्कादायक ! ‘केस’ कापणे 91 जणांना पडले महागात, निघाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. अशातच अमेरिकेत एका चुकीमुळे तब्बल 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत एका कोरोना पॉझिटिव्ह न्हाव्याच्या संपर्कात आल्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात काही व्यावसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे एका कोरोना बाधित न्हाव्यामुळे 91 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

परदेशी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बारबरमध्ये 8 दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण दिसून आली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केलं. सेल्फ आयसोलेशन करण्याऐवजी त्याने काम सुरु ठवेलं. ज्यामुळे सलूनच्या 84 ग्राहकांना आणि 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. वैद्यकीय विभाग सर्व बाधित लोकांपर्यंत पोहचल्याचे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेत कोरोना व्हायरसचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. जर याच गतीने कोरोना बाधितांची संख्या वाढत राहिली तर येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा तिप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका बातमीनुसार, इंपीरियल कॉलेजच्या एका नव्या आकड्यांनुसार अमेरिकेत 24 राज्यांमध्ये अनियंत्रित पद्धतीने कोरोनाचे संक्रमण पसरले आहे.