‘बाबा म्हणत नाही म्हणून दीड वर्षाच्या मुलीला दिले सिगारेटचे चटके’

छत्तीसगढ :  पोलीसनामा ऑनलाईन –   बाबा म्हणत नाही म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने चक्क दीड वर्षाच्या मुलीला सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार ( shocking-he-gave-cigarette-butts-to-one-and-a-half-year-old-daughter) छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी एका महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अविनाश राय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राय काही दिवसापूर्वी बालोद ठाण्यात काम करीत होता. दरम्यान तो सिवनी भागात एका महिलेच्या घरात राहत होता. त्या महिलेचा पती नागपूरमध्ये राहतो. बालोदमध्ये असताना त्याने महिलेला कही पैसे कर्जाऊ दिले होते. या दरम्यान 24 तारखेला राय आपले पैसे घेण्यासाठी महिलेच्या घरी गेला आणि तेथेच राहिला. रात्री रायने मुलीली बाबा म्हणायला सांगितले. मात्र जेव्हा मुलीने असे केले नाही तर त्याने सिगारेटने मुलीच्या चेहऱ्यावर, पोटावर आणि हातावर चटके दिले, त्यानंतर आरोपीने महिलेलाही मारहाण करून फरार झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राय विरोधात गुन्हा दाखल केला असून शनिवारी त्याला दुर्ग जिल्ह्यातील भिलाई शहरातून अटक केली आहे.