धक्कादायक ! आई, पत्नी, दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास लावून केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाईन – एका युवकाने आपल्या आई, पत्नी, आणि दोन मुलांची हत्या करून स्वतःला गळफास लावून आत्महत्या (shocking-he-killed-his-mother-wife-and-two-children-and-hanged-himself) केली.रायपूरमधील अभनपूरमधील केंद्री गावात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी शेजार्‍यांनी या घटनेची माहिती दिली. घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, आजारामुळे कुटुंब काळजीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेने छत्तीसगड हादरले आहे.

कमलेश साहू असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रायपूरचे एसएसपी अजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्री गावात राहणाऱ्या कमलेशने पत्नी, आई आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ला गळफास लावून घेतला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना कमलेशचा मृतदेह लटकलेला असताना त्याची आई, पत्नी व दोन्ही मुलांचे मृतदेह जमिनीवर आढळले होते. कुटुंबातील सदस्य कोणत्यातरी आजाराने त्रस्त होते. हे घटनेमागील कारण असू शकते. मात्र, पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत.

गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले
छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, एकाच कुटुंबातील पाच लोकांचा मृत्यू होणे ही मोठी गोष्ट आहे. मी घटनेचे कारण लवकरात लवकर शोधण्यास सांगितले आहे.