धक्कादायक ! पतीनं 3 वेळा ‘तलाक’ म्हणताच नातेवाईकांसह सासर्‍यानं केला सामुहिक बलात्कार

अलवर (राजस्थान) : वृत्तसंस्था – देशात तीन तलाक कायदा अस्तित्वात आला. मुस्लीम महिलांना न्याय मिळावा यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. मात्र, अद्याप ही तोंडी तलाक देण्याची पद्धत काही ठिकाणी अस्तित्वात असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला असून यामुळे नात्याला काळीमा फासला आहे. पतीने तीनवेळा तलाक म्हणताच नातेवाईकांसह सासऱ्याने महिलेवर सामुहिक बलात्कार केला. हा प्रकार 22 नोव्हेंबरला राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका गावामध्ये घडला आहे.

पीडीत महिलेने भिवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी अद्यापही मोकाट असल्याने संतापाची लाट उसळली आहे. पिडीता 25 वर्षाची असून तिचा विवाह 2015 मध्ये झाला होता. 2016 मध्ये तीने मुलीला जन्म दिला. यानंतर तिचा पती आणि सासरच्या मंडळींनी माहेराहून हुंडा आणण्यासाठी तीचा छळ सुरु केला. तीचा शारिरीक आणि मानसिक छळ सासरच्या मंडळींनी केला.

भिवाडीचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले, तक्रारदार महिलेने सांगितले की 20 नोव्हेंबरला हुंडा न आणल्याने तिला सासरच्यांनी एका खोलीत कोंडून बेदम मारहाण केली. यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 22 नोव्हेंबरला पतीने दारू पिऊन तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला. याच रात्री पिडीतेचा सासरा आणि अन्य एका नातेवाईकाने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला. पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून भिवाडी पोलिसांनी लगेचच तीची वैद्यकीय चाचणी केली. तसेच तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला.

Visit : Policenama.com