संतापजनक ! पुण्यात चक्क पतीनं सांगितलं पत्नीवर बलात्कार करायला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – पतीपत्नी होस्टेलवर रहात असताना तेथील एकाने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. पत्नीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पतीला सांगितले. तेव्हा पतीने दिलेल्या उत्तराने पत्नीला जबरदस्त धक्का बसला. पतीने तिला सांगितले की, मीच तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले होते, असे उत्तर दिले.

पत्नीच्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरेश शैशराज शिंदे (वय ३४, रा. हिलटॉप सोसायटी, धनकवडी) याला अटक केली आहे. तर या महिलेच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील एका होस्टेलवर नोव्हेंबर २०१९ मध्ये घडली होती.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर रहात होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्याच्या उत्तराने पत्नीला धक्का बसला. शेवटी तिने नातेवाईकांशी बोलल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन सुरेश शिंदे याला अटक केली आहे.