विधानसभा पोटनिवडणुक : 17 राज्यातील 51 जागांवर भाजपाला फक्त 15 जागा, 4 ठिकाणी पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांबरोबच अनेक राज्यातील पोटनिवडणूक देखील पार पडल्या. यामधील 17 राज्यांतील 51 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 15 जागांवर विजय मिळवला असून एनडीएने 21 जागांवर विजय मिळवला आहे. तर यूपीएला 13 जागांवर यश आले असून 17 जागेवर प्रादेशिक पक्षांनी यश मिळवले आहे. भाजपने उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक सात जागांवर विजय मिळवला आहे. सपाने तीन जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसने पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर तामिळनाडूमध्ये अन्नाद्रमुकने दोन जागांवर विजय मिळवत त्या कायम राखल्या आहेत.

भाजपचे गुजरात, राजस्थान, पंजाब आणि मध्यप्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेचे नुकसान झाले असून बिहार आणि पंजाबमध्ये त्यांच्या सहयोगी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाला देखील पराभव पत्करावा लागलेला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला असून दोन जागी त्यांचे उमेदवार नव्याने विजयी झाले आहेत. त्याचबरोबर बिहारमध्ये झालेल्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षाला म्हणजेच जेडीयूला तीन जागांचे नुकसान झाले असून त्यांना एकाच जगू विजय मिळवण्यात यश आलेले आहे.

आसाममध्ये भाजपला तीन, मेघालायमध्ये युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीला एक जागा

आसाम : या ठिकाणी भाजपला तीन जागांवर विजय मिळाला असून त्यांनी या जागा आपल्याकडे कायम ठेवल्या आहेत. तर एका जागेवर युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीला यश आले असून त्यांनी देखील आपली जागा कायम ठेवली आहे.

मेघालय: याठिकाणी युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीला यश आले असून अपक्ष उमेदवाराचा याठिकाणी पराभव करत त्यांनी जागा पटकावली आहे.

बिहारमध्ये ओवेसीने उघडले खाते
बिहारमध्ये झालेल्या पाच जागेवरील पोटनिवडणुकीमध्ये आरजेडी,जेडीयू आणि एमआयएमला प्रत्येकी एका जागेवर यश आले असून याठिकाणी जेडीयूचे मोठे नुकसान झाले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ओवेसींच्या एमआयएमने या ठिकाणी खाते खोलले असून त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत हा विजय मिळवला आहे.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये भाजपला खाते देखील उघडता आले नसून एकेकाळी दोन्ही राज्य भाजपचे गड होते. मध्यप्रदेशमधील झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कांतीलाल भुरिया यांनी विजय मिळवला. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत आपली जागा कायम राखली.

हिमाचलमध्ये भाजपला दोन जागा
हिमाचलप्रदेशमध्ये भाजपने दोन जागांवर विजय मिळवला असून धर्मशाळा आणि पच्छाद या ठिकाणी भाजपने विजय मिळवला. तर धर्मशाळामध्ये भाजपच्या उमेदवाराला बंडखोराने पराभूत केले असून या दोन्ही जागा पूर्वी भाजपकडे होत्या.
अरुणाचलमध्ये अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला असून या जागेवर त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला तीन जागा
पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने तीन ठिकाणी विजय मिळवला असून याठिकाणी आधी काँग्रेसकडे केवळ 1 जागा होती. त्यामुळे भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना याठिकाणी मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस आणि इतर विजयी
काँग्रेसमध्ये झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला असून एका जागेवर इतर पक्षांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे एका जागेवर भाजपला नुकसान झाले आहे.

केरळमध्ये काँग्रेसला दोन जागा तर भाजपचा पराभव
केरळमध्ये पाच जागी झालेल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी दोन जागी, काँग्रेस दोन जागी तर इंडियन यूनियन मुस्लिम लीगला एका जागी यश मिळाले आहॆ.
ओडिशामध्ये विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला एका जागेवर यश मिळाले आहे. त्यामुळे आता विधानसभेत त्यांची संख्या 113 झाली आहे.

गुजरातमध्ये भाजपचे नुकसान
गुजरातमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला तीन जागांवर नुकसान झाले असून आधी त्यांच्याकडे चार जागा होत्या. याठिकाणी भाजपने तीन ठिकाणी तर काँग्रेसने तीन ठिकाणी विजय मिळवला आहे.

तेलंगणा आणि सिक्कीममध्ये झालेल्या निवडणुकीत तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्रसमितीच्या उमेदवाराने विजय मिळवला असून सिक्कीममध्ये भाजपला दोन जागांवर विजय मिळाला आहे तर सिक्किम क्रांतिकारी मोर्चाला एका जागेवर यश मिळाले आहे. तर तामिळनाडूमध्ये अन्नाद्रमुकने दोन जागांवर विजय मिळवला असून या जागा आधी त्यांच्याकडेच होत्या.

 

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा