धक्कादायक ! मंदिरातील 3 साधूंचा महिलेवर 7 वेळा बलात्कार

राजकोट : वृत्तसंस्था – मंदिरातील तीन साधूंनी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी तीन साधूंना अटक केली आहे. ही धक्कादायक घटना गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात घडली आहे. पीडित महिलेने आरोपी साधूंनी आपल्यावर 7 वेळा बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अमरेली पोलिसांनी साधूंना अटक केली आहे. या प्रकरणाची दम नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या साधूंना अटक करण्यात आली.

या महिलेने मजुरीच्या नावाखाली साधूंनी गेले 18 महिने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. पोलीस सध्या या साधूंनी आणखी इतर महिलांवर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केले आहेत का, याचा तपास करत आहेत. पोलिसांनी रघुराम भंगार, जगदीश भागात आणि भावेश भागात अशा तीन साधूंना अटक केली आहे.

राजस्थानमध्ये अशीच घटना घडली, जैन साधूला अटक
अलीकडेच राजस्थानच्या करौली जिल्ह्यात एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेमध्ये एका जैन साधूला अटक करण्यात आली होती. या साधूकडून पोलिसांनी कंडोम पॅकेट्स, 33 पेन ड्राईव्ह आणि दोन लॅपटॉप हस्तगत केले आहेत. हस्तगत केलेल्या वस्तू पोलिसांना आरोपी रहात असलेल्या आश्रय निवासात एका मोठ्या बॅगमध्ये सापडल्या या बॅगेमध्ये तब्बल 19 मोबाइल फोन, 2 लॅपटॉप, 4 हार्ड डिस्क, कंडोम पॅकेट्स आणि 33 पेन ड्राईव्ह होते. पोलिसांनी सापडलेल्या हार्ड डिस्कची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना काही अश्लील व्हिडिओ आढळून आले.