धक्कादायक… वडिल,आजी-आजोबा अन् काकांच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ चिमुरड्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सिंहगड भागात काही दिवसांपूर्वी औषध फवारणीमुळे एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाला होता. आता या घटनेबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या घटनेत डोंगरे कुटुंबातील सार्थक (९), साहिल (११) वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही मुलाचे वडील संदीप डोंगरे यांनीच घरात पेस्ट कंट्रोल करून पत्नी आणि मुलांना झोपायला सांगितले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तसेच संदीप डोंगरे त्यांच्या पत्नीला माहेरवरून १० लाख आणण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याची देखील माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या घटनेला एक वेगळेच वळण लागले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्यातील सिहंगड भागात आनंदनगर येथील सिद्धार्थ अर्पाटमेंट येथे डोंगरे कुटुंबीय राहतात. दरम्यान संदिप हे तुळजाभवानी इंटरप्रायझेस याठिकाणी औषध फवारणीचे (पेस्ट कंट्रोल) काम करतात. त्यामुळे फवारणीचे औषधे त्यांच्या घरात असतात. डोंगरे यांच्या घरी ढेकणांचा उपद्रव झाल्यामुळे त्यांनी पेस्टकंट्रोल केले. डोंगरे यांच्या घरी पेस्ट कंट्रोल केल्यानंतर त्यांच्या ९ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. जेवण झाल्यानंतरच घरातील सर्वांनाच उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्याच दुसऱ्याच दिवशी सार्थक डोंगरे या ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

दुसरीकडे साथर्कचा मोठा भाऊ साहिल व वडिल संदिप यांनाही त्रास सुरू झाल्याने नातेवाईकांना त्यांनाही दुसर्‍या रुग्णालयात दाखल केले होते. दोघांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारानंतर संदिप हे मंगळवारी शु्‌द्धीवर आले. आदल्या दिवशी घरी येताना खाण्यासाठी भेळ घेऊन आलो होतो. तीही अर्धवट खाल्ली व झोपल्याचे सांगितले. पोलिसांनी घराची पाहणी केली. त्यावेळी भेळ आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी भेळ तपासणीसाठी पाठविली आहे. त्यामुळे शवविच्छेदनाचा व भेळचा अहवाल आल्यानंतर नेमका प्रकार स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, अन्नातून विषबाधा झाली नसल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेविषयी अधिक तपास उपनिरीक्षक मोहिते हे करत आहेत.

या प्रकरणी मुलांचे वडिल संदीप डोंगरे, मुलांचे आजी-आजोबा, काका,काकू चुलत आजी यांच्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाची आई जानव्ही यानी फिर्याद दिलीआहे. यात सार्थक डोंगरे (वय ९) व साहिल डोंगरे (11) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी सार्थकाचा मृत्यू….

ते दिवस म्हणजे गणेशोत्सवाचे होते. ज्या दिवशी घरात पेस्ट कंट्रोल केले गेले त्या दिवशी संदीप डोंगरे यांचा लहान मुलगा सार्थक डोंगरे याचा वाढदिवस होता. घरी पेस्ट कंट्रोल करून सर्वजण थोडा वेळ बाहेर गेले. आल्यानंतर सर्वानी सार्थकाच्या वाढदिवसाचे जेवण केले. त्यानंतरच कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाच्या त्रास होऊ लागला. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच सार्थकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.