धक्कादायक ! आयफोनचा स्फोट : आयफोन वापरणाऱ्यांनो सावधान !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – iPhone X चा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपडेट करताना हे घडल्याचे समजते आहे. अॅपलने नुकतीच लाँचे केलेली आयओएस 12.1 अपडेट करताना दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त लाँच केलेला iPhone X चा स्फोट झाला. सदर घटना ही वॉशिंग्टनच्या फेडरल वेमध्ये घडली आहे. हा फोन केवळ 10 महिने जुना असल्याचे ग्राहकाने सांगितले असून अॅपल या घटनेची चौकशी करत आहे.
 युजरने कंपनीच्या केबल आणि चार्जरला लावून चार्जिंग सुरु केले होते. चार्जिंग सुरु असताना हा फोन फुटल्याचे समजते आहे. फुटण्याअगोदर  फोन गरम झाला होता आणि त्यातून धूर निघू लागल्याचे या युजरने सांगितले आहे. फोनचा स्फोट झाल्यानंतर त्याने लगेचच चार्जिंग केबल काढून टाकली. या घटनेची माहिती त्याने लगेचच अॅपलला कळविली. तसेच हा फोन कंपनीला पाठविण्यासही सांगितले आहे.  iPhone X हा फोन लाँचिंगनंतर जास्त किंमत आणि त्यानंतर त्यातील समस्यांमुळे वादग्रस्त ठरला होता. या युजरने नुकतीच आयओएस 12.1 अपडेट केली होती.
याआधीही अशीच एक घटना समोर आली होती
सॅमसंगच्या एका मोबाईलचा तर चक्क विमानात स्फोट झाला होता. गेल्या वर्षी Samsung च्या Galaxy Note 9 मध्येही असाच स्फोट झाला होता. यानंतर सलग काही दिवस अशा घटना घडल्या. विमानातही या मोबाईलचा स्फोट झाला होता. शेवटी या फोनला विमान प्रवासात बंदी आणण्यात आली होती. नंतर कंपनीने या फोनचे उत्पादनच बंद केले होते. यामध्ये सॅमसंगचे मोठे नुकसानही झाले होते.