धक्कादायक ! शाळेतच मुख्याध्यापिकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन खून

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेमध्ये महिला मुख्याध्यापकेचा कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गोंदिया तालुक्यात घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे तर विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

प्रतिभा दिलीप डोंगरे (वय-५१) असे खून झालेल्या महिला मुख्याध्यापिकेचे नाव आहे. प्रतिभा डोंगरे या गोंदिया तालुक्यातील ईर्री येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्य़रत आहेत. त्यांच्या खूनाची बातमी गावात वाऱ्यासाखी पसरली. गावकऱ्यांनी बातमी समजताच शाळेच्या दिशेने धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. हा खून कोणी का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन आरोपीला पकडण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या आहेत.

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’