धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे माजी मठाधिपतींनी केली विद्यमान मठाधिपती जयवंत महाराजांची हत्या, वारकरी संप्रदायात प्रचंड खळबळ

पंढरपुर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपुरात ह.भ.प जयवंत महाराज पिसाळ यांची हत्या झाल्याचे वृत्त समजताच राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषत: वारकरी संप्रदायासाठी हा प्रकार धक्कादायक आहे. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पंढरपूर शहरातील कराडकर मठात मठाधिपती निवडीवरून झालेल्या गोंधळात महाराजांनीच महाराजांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

कराड येथील मारुतीबुवा कराडकर यांचा पंढरपुरात झेंडे गल्लीत मठ आहे. या मठाचे मठाधिपती होण्यावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सरु होता. विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ (वय 34, रा.लवंगमाची, ता. वाळवा, जि. सांगली) हे आहेत; तर माजी मठाधिपती बाजीरावबुवा जगताप उर्फ कराडकर हा पुन्हा आपणास मठाधिपती करावे, म्हणून आग्रही होता. याच वादातून मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या वाजण्याच्या सुमारास मठाच्या एका खोलीत जयवंत महाराज आणि बाजीरावबुवा यांच्यामध्ये वाद झाला. त्या दरम्यान बाजीरवबुवाने आपल्या खोलीत ठेवलेल चाकू आणून जयवंत महाराज यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर, शरीरावर वार करून निर्घृण हत्या केली. एका वारकऱ्याने ही घटना खिडकीतून पाहिली आणि पोलीसांना याबाबत माहिती कळवली. पोलीसांनी वारकऱ्याला त्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी बाजीरावबुवा यांना पळून जाण्यास संधीच मिळाली नाही. घटनास्थळी रंगेहात त्यांना पकडण्यात आले.

याबाबत उपविभागीय पालीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितले की, पंढरपूर येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या झाला आहे. मठाचे माजी मठाधिपती बाजीराव जगताप उर्फ कराडकर यांनी ही हत्या केली असून मठाधिपतीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. पंढरपूर येथे राज्यातील अनेक महाराजांचे मठ असून यापैकी कराडकर महाराज मठामध्ये ही थरारक घटना घडली आहे. चाकूने वार करून जयवंत महाराज पिसाळ यांची हत्या झाल्याचे, पोलिसांनी सांगितले. जयवंत महारात पिसाळ हत्या प्रकरणी बाजीराव जगताप यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजीरावबुवा याच्यावर अनेक गुन्हे –

बाजीरावबुवा जगताप उर्फ कराडकर हा मारूतीबुवा कराडकर यांचा उत्तराधिकारी म्हणून मठाधिपती नियुक्ती केली होती. मात्र, त्याचे वर्तन पाहून मठाच्या विश्वस्तांनी बाजीरावबुवा यांना मठाधिपदावरून काढून टाकले होते. त्याच्या ठिकाणी हभप जयवंत महाराज यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेंव्हापासून हा वाद सुरु होता.

बाजीरावबुवा यांच्या विरोधात कराड पोलीसांत विविध गुन्हे दाखल असल्याचे आणि एक वर्ष तो सातारा जिल्ह्यातून हद्दपार होता, असे मठातील वारकऱ्यांनी सांगितले. तसेच बाजीरावबुवाने एकदा एका वारकऱ्याच्या डोक्यात वीणा घातल्याचे देखील वारकऱ्यांनी सांगितले.

सोमवारी एकादशी होती आणि घटना घडली त्या दिवशी द्वादशी होती. एकादशीला पंढरपुरात मठात  आलेले भाविक द्वादशीची पंगत करून परत गावी जात असताना अर्ध्या वाटेत असतानाच त्यांना ही घटना समजली. त्यातील अनेक वारकरी परत पंढरपुरला आले. या घटनेने वारकरी संप्रदायामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/