धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर विवाहितेचा बलात्कार : पतीची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये धक्कादायक घटना समोर आली असून येथील एका विवाहित महिलेने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी या आरोपी महिलेला अटक केलीआहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमलता असे या आत्महत्या केलेल्या आरोपी महिलेचे नाव असून तिने याआधी देखील अनेक मुलींवर अशापद्धतीने बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

या महिलेची तीन लग्न झाली होती. तुला पुरुषांसारखे राहण्याची आवड होती. तिला नेहमी महिलांबरोबर संबंध ठेवण्याची इच्छा होत असे. अनेक मुलींना फोन करून ती पुरुषाच्या आवाजात बोलत असे. तसेच ती मुलींना आपले नाव साई रमेश रेड्डी सांगात असे. त्यानंतर मुलींना घरी बोलावून ती त्यांच्यावर सेक्स टॉयच्या मदतीने बलात्कार करायची. त्यानंतर या मुलींना धमकी देऊन ती शांत बसण्यास सांगत असे.

मात्र एकदा एका मुलीने याबाबत आपल्या पालकांना सांगितल्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिच्या घरामध्ये पुरुषांचे विविध कपडे देखील आढळून आले होते.
दरम्यान, पोलिसांनी या महिलेला अटक केल्यानंतर आता तिच्या पतीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्याला आपल्या पत्नीच्या या कृत्यानंतर धक्का बसला होता.

Visit : Policenama.com