धक्कादायक ! मंगळसुत्र, बांगड्या घालून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

कोटा : मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत असताना १२ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाने गळ्यात मंगळसुत्र, हातात बांगड्या घालून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
तो मोबाईलवर ब्लू व्हेलसारखा ऑनलाईन खेळ खेळत असल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे.

कोटातील विज्ञाननगरमध्ये तो आपल्या पालकांसह राहता होता. शाळेला सुट्टी असल्याने तो दिवसभर घरात मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत असे. रात्री जेवण केल्यानंतर तो त्याच्या बेडरुममध्ये झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई उठवायला गेल. तरीही त्याने आतून प्रतिसाद दिला नाही. शेवटी घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी तो बेडरुममध्ये नव्हता. बाथरुमचा दरवाजा बंद होता. तो दरवाजाही तोडल्यावर आतील दृश्य पाहून सर्व जण हदरले. मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घातले होते.

या सर्व प्रकाराने त्याचे पालक आणि पोलीसही चक्रावले आहेत. तो नेमका कोणती गेम खेळत होता. त्यात असे काय होते की, त्याने महिलेचा वेश धारण करुन आत्महत्या केली, याचा पोलीस शोध घेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

२१ जून जागतिक योग दिन : ” हे ” आहेत भारतातील सर्वात मोठे योगगुरू

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘त्या’ महिलेचे स्तनांची रहस्यमय पद्धतीने वाढ, डॉक्टर्सही चिंतेत