धक्कादायक !!! संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणाचा आईनेच केला खून

चिपळूण (रत्नागिरी) : पोलीसनामा ऑनलाईन

सोमवारी संशयास्पद मृत्यू झालेल्या पोफळी येथील तरुणाचा खून त्याच्या आईनेच केला असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विक्रांत राजाराम पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी त्याची आई राजश्री पवार हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . मद्यपी मुलाकडून तीन वर्षे होणारा त्रास आणि मारहाण याला कंटाळून तिने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

खडक पोलिसांनी सापडलेली बॅग केली परत

पोफळी पवारवाडी येथे सोमवारी सकाळी विक्रांतचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता विक्रांत रात्री मद्यपान करून घरी आला होता तेव्हा त्याच्या अंगावर अपघात झाल्याच्या जखमा होत्या , अशी माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली . मात्र त्याच्या शरीरावरील जखमा पाहून त्या अपघाताच्या खुणा नसल्याची पोलिसांना शंका आली . त्याबाबत अधिक चौकशी केली असता आपण दारूच्या नशेत असणाऱ्या विक्रांतला मारहाण केल्याची व त्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली तिने दिली. गेल्या तीन वर्षांपासून विक्रांत खूपच दारूच्या आहारी गेला होता. तसेच तो दारूच्या नशेत आपल्याला व आपल्या मुलीला मारहाण करत असे . १६ सप्टेंबर रोजी दारूच्या नशेत येऊन त्याने आपल्याला मारहाण केली तसेच त्याने आपल्या लहानग्या नातीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण त्याला काठीने मारहाण केली आणि दोरीने गळा आवळला व त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी कबुली राजश्री पवार हिने दिली आहे.

[amazon_link asins=’B07BCGC13F,B0748NPV86′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56d2a8eb-bb34-11e8-b54d-bb73c33b4532′]