मुंबईच्या डॉक्टरचा युवतीवर वेळावेळी बलात्कार, त्यानंतर केला धक्कादायक प्रकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सहकारी तरुणीला लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्यावर जुलै 2018 आणि सप्टेंबर 2020 दरम्यान वारंवार बलात्कार करणा-या मुंबईतील एका डॉक्टरावर (mumbai-doctor-repeatedly-rapes-young-woman) डहाणू (पालघर) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची माहिती डहाणू पोलिसांना दिली आहे.

एका अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, 30 वर्षीय तरुणीने डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यात पीडित तरुणीने तक्रारीत लग्नाच वचन देत माझ्यावर मुंबईच्या डॉक्टरने वारंवार बलात्कार केलाचे म्हटले आहे. तसेच मला गर्भपात करण्यास सांगत आहे. त्याचप्रमाणे मी गर्भपात न केल्यास माझे आपत्तीजनक व्हिडीओ सार्वजनिक करेल अशी धमकीही मला देत आहे, अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केली नाही. आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You might also like