इचलकरंजीत मद्यपी मुलाच्या डोक्यात वरवंटा घालून आईनेच केला खून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मद्यप्राशन करून त्रास देणार्‍या मुलाला त्याच्या आईने वरवंटा फेकून मारल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. इचलकरंजी जवळील कोरोची या गावात ही घटना घडला आहे. रविशंकर तेलसिंगे (वय 34 ) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलाची आई लक्ष्मी तेलसिंगे यांना ताब्यात घेतले आहे. आईने स्वतःच्याच मुलाची हत्या केल्याच्या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे.

रविशंकर हा नेहमी दारू पिऊन घरच्यांना त्रास देत होता. शिवीगाळ, मारहाणीमुळे त्याच्या सततच्या वागण्याल्या कंटाळलेल्या आईने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले, असल्याची माहिती समोर आली आहे.

काल रात्री दहा वाजेच्या सुमारास आई व मुलात जोरदार भांडणे झाली होती. त्यामुळे आईने रागाच्या भरात वरवंटा मुलाच्या दिशेने फेकला. त्याच्या डोक्याला घाव बसल्यामुळे जखमी झालेल्या रविशंकरला तातडीने इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवले होते. उपचार सुरू असताना रविशंकरचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाच्या आईस शहापूर पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like