धक्कादायक ! ‘बायल्या’ म्हणून चिडवल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील तरूणाची आत्महत्या

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार जिल्ह्यातील एका तरुणाने चेन्नईमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय तरुणाला मुलीसारख्या वागण्यामुळे मोठ्या प्रमाणात चिडवले जात असल्यामुळे त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला. त्याला सतत हिजडा, बायल्या म्हणून चिडवले जात असे. तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली असून यात त्याने आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा तो रहिवासी आहे. या सुसाईड नोट मध्ये त्याने लिहिले कि, माझे शरीर हे पुरुषासारखे असले तरी मी मुलींसारखा वागत होतो. मला अनेकदा हिजडा, बायल्या म्हणून चिडवले जायचे. लोकं माझा तिरस्कार करायचे. मी माझ्या भावनांवर नियंत्रण नाही ठेवू शकलो. यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे त्याने सुसाईड नोट मध्ये लिहिले.

दरम्यान, आत्महत्या केलेला हा मुलगा अत्यंत गरीब घरातील असून पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

Loading...
You might also like