डायरेक्टरसोबत झोपायला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेटचे प्रोजेक्ट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदी सिनेसृष्टीत कास्टींग काऊचवर अनेकदा लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. मीटू चळवळीतूनही अनेक महिलांनी आणि कलाकारांनी त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडली आहे. यात अनेक दिग्गजांजी नावे समोर आली आहेत. अशात आता बॉलिवूड स्टार नरगिस फाकरीनं आपल्यावरील अत्याचाराबद्दल खुलासा केला आहे.

रॉकस्टारमध्ये झळलेली ही अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर असल्याचं दिसत आहे. एका मुलाखतीत तिनं तिला आलेले अनुभव शेअर केले आहेत. नरगिसनं आपला अनुभव सांगितल्यानंतर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आला आहे.

नरगिस म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला प्लेबॉय मॅगेझिनसाठी ऑफर आली होती. हा खूप मोठा ब्रँड आहे. यातून भरपूर पैसाही मिळाला असता. परंतु चारित्र्यावर शिंतोडे उडतील अशी कोणतीही गोष्ट मला करायची नव्हती. त्यामुळे मी सर्व ऑफर्स धुडकावून लावल्या. याशिवाय सुरुवातीच्या काळात अनेक दिग्गजांनी मला कॉम्प्रोमाईज करायला सांगितलं. अनेक मोठ्या दिग्गजांना मी ते करण्यासाठी नकार दिला. कारण मला या सगळ्यापासून लांब रहायचं होतं.”

नरगिस पुढे म्हणाली, “बॉलिवूडमध्ये भूमिकेची गरज असली तरीही न्यूड सीन, सेक्स सीन देण्यासाठी मी कम्फर्टेबल नाही. त्यामुळे अशा कोणत्याही ऑफर्स स्विकारत नाही. असे अनेक मोठे प्रोजेक्ट मी सोडले आहेत. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी अशा प्रकारचे काम करण्यापेक्षा थोडक्या आणि चांगल्या ऑफर्स स्विकारण्याकडे माझा कल असतो.” असं तिनं सांगितलं.

नरगिसच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर रॉकस्टार सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. या सिनेमात ती रणबीर कपूरसोबत झळकली होती. हा सिनेमाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यातील तिच्या अभिनयाचेही कौतुक झालं होते. गेल्या काही दिवसांत नरगिस स्क्रीनवर दिसलीच नाही.

https://www.instagram.com/p/B5MYTG3ApAz/

https://www.instagram.com/p/BkfwbpXB_-6/

 

Visit : Policenama.com