धक्कादायक ! WhatsApp युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवताहेत इतर Apps

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. इतर सोशल मीडिया अ‍ॅपच्या तुलनेत वापरायला सोपे असल्याने व्हॉट्सअ‍ॅप युझर्सची संख्या मोठी आहे. पण व्हॉट्स अ‍ॅपच्या कोट्यावधी युझर्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हॉट्स अ‍ॅप युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर इतर अ‍ॅप्स नजर ठेवत असल्याचे उघड झाले आहे. काही अ‍ॅप व्हॉट्स अ‍ॅप युझर्स कुणाशी बोलताना, कधी झोपताना याची माहिती ठेवत असल्याचे समोर आले आहे.

एका संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. यानुसार प्रायव्हसी पॉलिसीबाबत व्हॉट्सअ‍ॅपला अभिमान आहे. परंतु फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या या अ‍ॅपकडून सामायिक केला जाणारा डेटा बाहेरील डझनभर अ‍ॅप्सना व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटींवर नजर ठेवण्याची संधी देत असल्याचे दिसून आले आहे. या माध्यमातून युझर्स कोणाशी बोलतात, कधी झोपतात आणि कधी आपल्याकडील मोबाइलचा वापर करतात, याची माहिती या अ‍ॅप्सकडून घेतली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युझर्सच्या माहिती आमि परवानगी शिवाय त्याच्या डिजिटल सवयी जाणून घेण्यासाठी हे अ‍ॅप्स आणि सर्व्हिसेस व्हॉट्सअ‍ॅपमधील ऑनलाईन सिग्नलिंग प्रणालीचा वापर करतात. अशा अ‍ॅप्समुळे व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमाकडून युझर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न होत असले तरी कशाप्रकारे युझर्सला ट्रॅक करण्यासाठी त्याचा डेटा वापरला जाऊ शकतो, हे समोर आले आहे.