धक्कादायक ! चिमुकलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पोलिसाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. संजय वाघमोडे (वय-३५) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून त्याने घराजवळ राहणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

संजय वाघमोडे हा ताडदेव येथे एनए-३ विभागात कार्यरत आहे. वडाळा येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या संजयने तीन दिवसांपूर्वी चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने घरात बोलावून घतेल. घरात आल्यानंतर तिच्यासोबत अश्लिल कृत्य. हा प्रकार मुलीने आपल्या मोठ्या भावाला सांगितला.

तिच्या भावाने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने वडाळा पोलीस ठाण्यात संजय विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. संजय याने यापूर्वी एका महिलेचा विनयभंग केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची