धक्कादायक ! मावशीचा ‘आक्षेपार्ह’ व्हिडीओ व्हायरल करण्याची ‘धमकी’ देत भाचीवर ‘अत्याचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मावशीचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत भाचीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली. ही घटना जोगेश्वरी येथे घडली असून याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपी आशीष दुबे उर्फ अजमल लष्कर (वय-26) याला अटक केली आहे.

जोगेश्वरी परिसरात एका कौटुंबिक कार्यक्रमात पीडित मुलीच्या मावशीसोबत आरोपीची भेट झाली. या दोघींना स्वत:ची ओळख आशीष दुबे अशी करून देत आपण एका खासगी कंपनीत कामाला असल्याचे आरोपीने सांगितले. मावशीचा मोबाईल क्रमांक त्याने मिळवून तिच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरु केली. दरम्यान, दोघांमध्ये असलेली मैत्री वाढत गेली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्यावेळी त्याने त्याच अवस्थेत एक व्हिडीओ बनवला.

त्यानंतर आरोपीची भेट सोळा वर्षाच्या पीडित मुलीसोबत झाली. त्याने तिला एकटे गाठत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तिच्या मावशीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी ती गरोदर असल्याचे समजले. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या पालकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

फेसबुक पेज लाईक करा –