पनवेलच्या कोविड सेंटरमध्ये ‘कोरोना’ग्रस्त महिलेचा विनयभंग, एकावर FIR दाखल

नवी मुंबई, 17 जुलै: मुंबईमध्ये कोरोना विषाणूने अनेकांना हैराण केले आहे. याचा फैलाव अधिक होत आहे. याच काळात क्वारंटाइन सेंटरमध्ये एका महिला रुग्णाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक समोर आला आहे. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे. यातील संशयित आरोपीरिरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही.

याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांवर विनयभंग केल्याप्रकरणीचा गुन्हा नोंदविला आहे. संशयित आरोपी काल क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल झाला होता. आरोपीची कोरोना चाचणी घेतल्याने त्याचा रिपोर्ट आज संध्याकाळी येणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी आणि पीडित महिला दोघेही नवी मुंबईतील राहणारे असून नवी मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णांना पनवेलमध्ये कॉरंटाइन केले आहे. याबाबतचा गुन्हा पनवेल तालुका पोलिसांनी दाखल केला आहे. आरोपी कोरोना संशयित असल्याने त्याला अद्याप अटक केलेली नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिलीय.

आरोपीचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर पनवेल तालुका पोलिस त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई करतील, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिलीय. एखादी महिला कोरोनाविरुद्ध लढा देत असेल आणि त्याचवेळी तिच्यावर असा प्रसंग होत असेल तर याला जबाबदार कोण?, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.