धक्कादायक…. बलात्कारकरून महिलेला जिवंत जाळले; 100 नंबरला फोन करुनही मिळाली नाही मदत

संभलः वृत्तसंस्था-

पाच लोकांनी एका महिलेवर बलात्कार केल्यानंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यात घडली आहे. आराम सिंह नावाच्या व्यक्तीसह पाच लोक पीडितेच्या घरी गेले आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती गुन्नाैर येथील पोलीस क्षेत्रअधिकारी अकील अहमद यांनी दिली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89bbe0fe-88f0-11e8-a951-f59e499cda17′]

पीडीत महिलेचा पती गाजियाबाद येथे मजूरीचे काम करतो. तर पीडित महिला तिच्या 7 वर्षाच्या मुलीसोबत गावी राहत होती. पाच नराधमांनी पडितेवर अत्याचार केल्यानंतर त्यांनी तिली कोणालाही काही न सांगण्याची धमकी दिली होती. मात्र पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती भावाला सांगितली. काही वेळानंतर पुन्हा ते पाच लोक तिच्या घरी आले आणि बाजूला काम चालू असलेल्या एका मंदिराच्या परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्यांनी पीडितेला जिवंत जाळले.

यामध्ये तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाबा म्हणजे पीडितेच्या भावाने 100 नंबरवर फोन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र फोन वाजत राहिला परंतू कोणीही तो फोन उचलला नाही. सदर प्रकरणात आराम सिंह, महावीर, चरणसिंह, गुल्लू उर्फ भोना यांच्याविरोधात बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.