काय सांगता ! होय हो, पुण्यात औषध प्रिस्काइब करावं म्हणून डॉक्टरांना चक्क ललनांची ‘ऑफर’, तर काही वेळा डॉक्टरांकडूनही मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषध प्रिस्क्राईब करावे यासाठी कंपन्यांकडून डॉक्टरांना भेटवस्तू, सवलती, डेबिट-क्रेडिट कार्ड दिले जाते. एवढेच नाही तर डॉक्टरांच्या मनोरंजनासाठी स्त्रियाही पुरवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. पुण्यातील दोन डॉक्टरांनी हे भयंकर सत्य उजेडात आणले आहे. पुण्यात आरोग्यविषयक काम करणाऱ्या साथी या स्वयंसेवी संस्थेच्या डॉ. अरुण गद्रे आणि डॉ. अर्चना गिवटे यांनी हे वास्तव उघड केलं आहे.

डॉ. अर्चना गिवटे आणि डॉ. अरुण गद्रे यांनी सहा शहरांमध्ये केलेल्या अभ्यासात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यांनी सहा जिल्ह्यातील मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह आणि डॉक्टरांशी बोलून हे वास्तव समोर आणले आहे. फार्मा कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातले असे अवैध व्यवहार त्यांनी समोर आणले असून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दोघांनी मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह आणि डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन हा सर्वे केला आहे. फार्मा कंपन्या आपले औषध प्रमोट करण्यासाठी कोणकोणत्या क्लृप्त्या लढवतात हे यातून उघड झालं. या संबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

फार्मा कंपन्या डॉक्टरांचे दोन गट तयार करतात. कोअर ग्रुपमध्ये डॉक्टर कंपन्यांना थेट फायदा करुन देतात. तर सेकंडरी ग्रुपमधील डॉक्टर यामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी होतात, असे या वृत्तात म्हटले आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांचा वेगळा गट असतो. आणि नामांकित डॉक्टरांचा वेगळा गट असतो. या सर्वांची यादी कंपन्यांकडे असते. वेगवेगळ्या गटातील डॉक्टरांची खास काळजी कंपनीकडून घेतली जाते, असे अहवालात म्हटलं आहे.

या कंपन्यांकडून डॉक्टरांना विविध भेटवस्तू, शॉपिंग व्हाउचर्स, क्रेडिट कार्ड दिली जातातच, पण मनोरंजनासाठी स्त्रियाही पुरवल्या जातात, असं या अभ्यासात दिसून आलं. या अभ्यासासाठी 75 डॉक्टर आणि 40 मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हच्या मुलाखती घेण्यात आल्या. दरम्यान, काही डॉक्टरांकडून मी तुमची औषधं खपवतो पण तुम्ही मला काय देणार असा सवाल देखील करण्यात येतो. काही वेळा मोजक्या काही डॉक्टरांकडून एमआरकडे महिला अथवा मुलींची मागणी होते अशीही माहिती समोर येत आहे.

Visit : Policenama.com