मला विषप्रयोग कुणी केलाय, त्याबद्दल मला माहिती होते; परंतु…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ( Bollywood) गानकोकिळा लता मंगेशकर ( lata Mangeshkar) यांनी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर विषप्रयोग केला गेल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. या विषप्रयोगामुळे जवळपास तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आजारपणाचा जास्त बाऊ न करता त्यांनी त्यावरही मात करत पुन्हा जोमाने काम करू लागल्या. कारकिर्दीच्या अतिशय उंच शिखरावर त्यांच्यावर हा विषप्रयोग झाल्याने त्यांनादेखील मोठा धक्का बसला होता.

मुलाखतीत बोलताना त्यांनी ‘मला माहीत होतं की, माझ्यावर कोणी विषप्रयोग केला आहे. पण माझ्याकडे त्या व्यक्तीबद्दल कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही. पण एखादी व्यक्ती असं वागू शकते, असा अनुभव घेऊन मला धक्काच बसला होता. ही घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनीदेखील कुणालाही याविषयी जास्त काही माहिती नाही. विषप्रयोग झाल्यानंतरच्या अनुभवाबद्दल सांगताना लता मंगेशकर म्हणतात, ‘मी आजारी असताना मजरुह सुलतानपुरी यांनी त्या काळात त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून माझ्यासाठी वेळ काढत. ते मला भेटायला आमच्या घरी येत.

दरम्यान, एका दिवशी आमच्या घरी हेमंत कुमार आले. त्यांना माझ्याकडून गाणं गाऊन घ्यायचं होतं. आईच्या परवानगीनंतर मी गाणं गायलं’ लतादीदींनी या दुर्घटनेनंतर गायलेलं पहिलं गाणं होतं, ‘कही दीप जलें कहीं दिल. परंतु हे रेकॉर्डिंग चांगले होईल की नाही याची माझ्या मनात शंका होती. परंतु सुदैवाने चांगले रेकॉर्डिंग झाले, माझा आवाज मी गमावला नव्हता, याचाच मला आनंद होता. शेवटी याच गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

You might also like