खळबळजनक ! ‘कोण नाही घेत’, तेव्हा मी स्वतःवर गोळी झाडून घेणार होतो : प्रवीण कुमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताचा जलद गती गोलंदाज प्रवीण कुमारने एक खळबळजनक खुलासा केला आहे. मला संघातून वगळल्यानंतर मी प्रचंड तणावाखाली गेलो होतो आणि स्वतःला गोळी मारून घेणार होतो. असा धक्कादायक खुलासा प्रवीण कुमारने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

प्रवीणने सांगितले की, 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर संघात स्थान न मिळाल्याने मी प्रचंड तणावाखाली होतो आणि स्वतःला गोळी मारून आयुष्य संपवणार होतो. तसेच मी दारू पितो असे देखील कारण मला सांगण्यात आले. पण कोण पीत नाही ? लोकांनी अशी धारणाच बनवून ठेवली आहे. मग अनेक चांगली कामे करतो, त्याकडे का पाहत नाहीत असा सवाल देखील यावेळी प्रवीण कुमारने उपस्थित केला आहे.

जेव्हा मी स्वत:वर गोळी झाडून घेण्याचा विचार करत होतो. त्याचवेळेस, गाडीत असलेल्या माझ्या मुलांच्या फोटोवर माझी नजर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य होते. त्यांचा तो फोटो पाहून मी माझ्या लहान मुलांसाठी तरी हे धाडस करू शकत नाही. त्यानंतर, तो विचार मी डोक्यातून कायमचा काढून टाकला, असे प्रवीण कुमारने सांगितले.

याचे कारण सांगताना, भारतामध्ये तुमच्याबद्दल एक वातावरण निर्माण केलं जातं. तसंच, माझ्याबद्दल चुकीचं वातावरण निर्माण केलंय. ती वातावरणनिर्मिती झाली की, पुन्हा तुम्ही काहीही करू शकत नाहीत. याच तणावातून मी स्वत:ला संपविण्याचा विचार करत होतो असा धक्कादायक खुलासा यावेळी प्रवीणने केला आहे तसेच त्याने आतापर्यंत नवीन तरुण मुलांना स्पाँसर केले आहे, जवळपास 10 मुलांची लग्न लावून देण्याचे काम केले आहे. अनेक किकेटर्संना आर्थिक मदतही मोठ्या प्रमाणावर केली आहे अशा प्रकारची अनेक कामे केल्याचेही प्रवीणने यावेळी नमूद केले.

 

फेसबुक पेज लाईक करा –