Pune : IT हबमध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला अटक, 25 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  देशभरात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून जोरदार कारवाया करण्यात येत आहेत. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येऊ लागलं आहे. त्यातच पुण्यातील हिंजवडीतील आयटी हबमध्ये 6 लाख 40 हजार किलो रुपयांचा तब्बल 25 किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ पथकाने सापळा रचून योगेश्वर गजानन फाटे या तरुणाला अटक केली असून तो जनता वसाहत गोखलेनगर पुणे येथे राहतो. तो २३ वर्षाचा आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज 2 येथे एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत 25 किलो गांजा सापडला असून त्याची एकूण किंमत 6 लाख 40 हजार आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदीप पाटील यांच्या पथकाकडून ही कामगिरी करण्यात आली आहे. लोकसत्ताकडून या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे दारू, सिगारेटसह गांजा विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती.राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यांनंतर पुन्हा अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. पुण्यातील उच्चभ्रू भाग आयटी हबमध्ये येय़े मोठ्या प्रमाणात गांज्याला मागणी असते आणि तिकडे त्याला चांगला दर सुद्धा मिळतो.