धक्कादायक ! ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चक्क ‘सेक्स’ स्कँडल, प्रार्थना करण्याच्या खोलीत खासदार ‘मज्जा’ मारतानाचे व्हिडीओ व्हायरल

ऑस्टेलिया : वृत्तसंस्था –  ऑस्ट्रेलियाच्या पार्लमेंटमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तेथील पार्लमेंटच्या प्रार्थना कक्षात खासदार कॉलगर्ल्सला बोलावून त्यांच्यासमवेत लैंगिक चाले करत असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटना प्रकरणाचे काही चित्रफीत व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाले आहे. त्या व्हिडिओ मध्ये तेथील काही खासदार आणि काही अधिकारी दिसून येत आहेत. या प्रकरणावरून ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हे वृत्त चुकीचे आहे. असे म्हटले आहे. मात्र, टॉम नावाच्या एका व्यक्तीने मीडिया समोर मुलाखती दरम्यान त्याने सोमवारी संसदेत सुरु असणारा प्रकार सांगितलं आहे.

याबाबत मुलाखतीवेळी टॉमने सांगितले की, संसदेतील खासदारांच्या शरीरसुखासाठी कॉलगर्ल्सला थेट संसदेत येण्याची परवानगी आहे. तेथील प्रार्थना कक्ष (prayer room) ते कॉलगर्ल्सला घेऊन जातात. तसेच यात काही सरकारी अधिकारी देखील सोबत असतात. हे अधिकारी एकमेकांचे अश्लील चित्रफीत देखील शेअर करत असतात’ असे आरोप टॉमने केले आहेत. या आरोपानंतर खासदारांचे प्रार्थना कक्षातील व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात जोरदार प्रदर्शनांना सुरुवात झाली आहे. यामध्ये काही महिला खासदार देखील सहभागी झाल्या आहेत. महिला खासदार मरिसे पायने यांनी सांगितले की, ‘ऑस्ट्रेलिया सरकारने या पूर्ण घटना प्रकरणाचा तपास केला पाहिजे. सरकारने यासाठी एक उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करावी. असे सांगितले आहे.