अभिनेत्री कंगना रणौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

पोलीसनामा ऑनलाइन –  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड स्टार कंगना रणौत हिनं मुव्ही माफियांद्दल युद्ध छेडलं होतं. व्हिडीओ शेअर करत तिनं अनेक खुलासे केले होते. आता कंगनाच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तिला घाबरवलं जात असल्याचा दावा तिनं केला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, सध्या कंगना तिच्या कुल्लू येथील घरात राहते. तिनं सांगितल्यानुसार, गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तिच्या घराबाहेर गोळीबार ऐकू आला आहे. आधी तिला हे फटाके असावेत असं वाटलं होतं. परंतु या मोसमात पर्यटक तिथं येत नसल्यानं हा परिसर शांत असतो. कंगनानं तिच्या बॉडीगार्डलाही आवाज दिला होता. परंतु कदाचित तो नवीन असल्यानं त्याला हा आवाज ओळखता आला नाही असंही तिनं सांगितलं.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरात तिच्यासोबत कुटुंबातील 4 सदस्य उपस्थित होते. यानंतर पोलिसांना कळवत कंगनानं हा प्रकार त्यांना सांगितला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वटवाघुळांमुळं स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. कदाचित त्यांनी कुणीतरी वटवाघुळांना मारण्याचा प्रयत्न केला असावा. परंतु स्थानिक शेतकऱ्याला बोलावलं असता त्यानं गोळीबार केला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. परंतु हे जाणून बुजून आणि मला घाबरवण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप कंगनानं केला आहे.

पोलिसांचं असं म्हणणं आहे की कंगनाच्या घराच्या आसपास गोळीबार झाल्याची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. इतकंच नाही तर फॉरेन्सिक टीमलाही परिसरात काही तत्सम वस्तू किंवा काडतूस आढळलेलं नाही. सध्या कंगनाच्या घराशेजारी राहणाऱ्या लोकांना विचारणा केली जात आहे आणि तिच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like