एक अशी देखील ‘नरभक्षी’ महिला, लोकांना ‘निघृण’पणे मारल्यानंतर ‘बनवत’ होती त्यांच्या मांसाचं ‘लोणचं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक महिला मानवी मांसाचे लोणचं बनवत असल्याचा प्रकार समोर आला. एक महिला अगदी सहज लोकांची हत्या करत होती आणि त्यांचे मांस खात होती. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या घरी छापा मारला तर ते थक्क झाले. ही महिला मागील काही दिवसांपासून लोकांची हत्या करत होती आणि त्यांचे मांस फ्रिजमध्ये स्टोअर करत होती. घरात पोलिसांना तपासात या मांसाचे लोणचं देखील मिळाले. या धक्कादायक प्रकारात महिलेचा पती देखील सहभागी होता.

रशियाच्या क्रसनोदर शहरात राहणाऱ्या दिमित्री बाकशाएव आणि त्यांची पत्नी नतालिया या दोघांना मानवी मांस खाण्याची आवड होती. त्याची ही आवड एवढी वाढली की अखेर ते नरभक्षी झाले. पोलिसांनी या प्रकारात त्यांच्या घरातून 8 लोकांचे शरीर ताब्यात घेतले.

लॅबमध्ये होणार तपास
नतालिया एक नर्स होती. ज्यामुळे ती काहींना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची हत्या करत होती. हत्या केल्यानंतर ते त्यांचे मांस खात होते. पोलिसांना जेव्हा त्यांच्या घरात मांसाचे लोणचं मिळाले तेव्हा त्यांनी ते लॅबोरेटरीमध्ये पाठवले यानंतर उघड झाले की हे मांस मानवीय आहे.

न्यायालयात नतालिया यांची बाजू ऐकून कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हते की एका भोळ्या चेहऱ्यामागे एक नरभक्षी असेल. नतालिया म्हणाली की त्यांनी कोणाचीही हत्या केली नाही, जे मृत व्यक्तीचा मृतदेह घरी आणून त्यावर प्रॅक्टिकल करत होते. या प्रकरणाचा खुलासा एक महिला अचानक गायब झाल्याने झाला. या महिलेच्या गायब झाल्यानंतर अनेक व्यक्ती असेच अचानक गायब झाले. पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला तेव्हा नतालिया आणि दिमित्रीवर संशय आला.त्यानंतर मारलेल्या छाप्यात हा खुलासा झाला.

अंधश्रद्धाळू होते पती पत्नी
हे दोघे पती पत्नी जादू टोण्यावर विश्वास ठेवत होते. त्यांचा यावर विश्वास एवढा वाढला की ते लोकांना घरी आणून बळी देऊ लागले. लोकांना मारल्यानंतर ते त्यांना खात असतं. पोलिसांना त्यांच्या घरात लोकांना कापण्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्रास्त देखील सापडले.

या दोघांनी शेवटी एका हॉटेलच्या महिला वेटरचा हत्या केली. नतालियाचा पती तिचं सर्व काही ऐकत होता, त्यामुळे नतालियाच्या सांगण्यावरुन त्याने महिलेची हत्या केली. या हॉटेलमधील एका महिला वेटरवर नतालियाला संशय होती की ती त्यांच्या पतीच्या मागे आहे, त्यामुळे तिने त्या मुलीला फसवून घरी बोलावले आणि त्याची हत्या करुन तुकडे तुकडे करुन डीप फ्रीजमध्ये ठेवले.

आता पर्यंत खाल्ले 30 लोक
पोलिसांनी या दोन्ही नरभक्षी हत्या करणाऱ्यांना ताब्यात घेतले तेव्हा ते आपला गुन्हा कबूल करत नव्हते. न्यायालयात देखील त्यांनी सत्य सांगितले नाही. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी कबूल केले की त्यांनी 30 लोकांची हत्या करुन त्यांचे मांस खाल्ले. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Visit : Policenama.com