धक्कादायक ! आयसीयुमधील 10 नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू; महाराष्ट्रात प्रचंड खळबळ

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – भंडार्‍यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Bhandara Hospital fire) अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यु झाला. या प्रकरणात ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरुन बालकांचा मृत्यु झाला आहे. आगीची चौकशी करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिटमध्ये पहाटे दीड वाजता ही घटना घडली आहे. आऊट बाॅर्न युनिटमध्ये आग लागली होती. प्राथमिक माहितीनुसार, शॉक सॅकिटमुळ आग लागल्याचे अंदाज आहे. ज्या मुलांचे जन्मलेल्यावेळी वजन कमी असते, त्या मुलांना मशीनमध्ये ठेवले जाते. या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली. या आयसीयुमध्ये कोणीही नव्हते.

पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास एका परिचारिकेला युनिटमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. तिने दरवाजा उघडल्यानंतर या युनिटमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. ही परिचारिका व आयाने डिस्टींगविशरच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करीत ७ नवजात बालकांना बाहेर काढले. परंतु, इतर १० बालकांचा जीव गुदमरुन मृत्यु झाला. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने येऊन आग विझविली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्याच्या प्रधान सचिवांसह आरोग्य अधिकारी भंडा र्‍याला पोहचत आहेत.