बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा ! म्हणाला – ‘सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…’

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी अभिनेत्याच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 4 जणांविरोधात एफआयआर देत गंभीर आरोप केले आहेत. मंगळवार दि 28 जुलै पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची टीम मुंबईत आली आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून या प्रकरणी मोठी घडामोड घडताना दिसत आहे. या सगळ्यानंतर आता रियाबद्दल आणखी काही खुलासे समोर येताना दिसत आहेत. सुशांतच्या बॉडीगार्डनं एका मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांतचा बॉडीगार्ड म्हणाला, “सुशांत गेल्यानंतर आता 40 दिवसांनी त्याच्या वडिलांनी रियावर जे आरोप केले आहेत. त्यात नक्कीच काहीतरी तथ्य असेल. जेव्हा रिया सुशांतच्या आयुष्यात आली तेव्हा त्याचं आयुष्यचं पूर्ण बदलून गेलं. इतर वेळी एवढा उत्साही राहणारा सुशांत सर सारखाच बेडवर पडून राहत असत. काही वेळा तर सुशांत त्याच्या रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून रहात असे. तेव्हा रिया वरच्या मजल्यावर तिची आई, भाऊ आणि काही मित्रांसोबत पार्टी करायची.”

बॉडीगार्डनं पुढं सांगितलं की, “सुशांत रियाला 2019 मध्ये भेटला होता. त्यानंतर ते युरोप ट्रीपलाही गेले होते. तिथून परतल्यानंतर सुशांत सारखाच आजारी पडत होता. त्याआधी सुशांत खूप सक्रिय होता. जीम, स्विमिंग, डान्स हे सर्वकाही तो करत होता. परंतु यानंतर मात्र तो बेडवर पडून राहू लागला.”

बॉडीगार्डनं असंही सांगितलं की, “सुशांतची औषधं आणायला जेव्हा मी जायचो तेव्हा मेडिकल वाले विचारत असे की, हे औषध कुणी मागवलं कुणासाठी आहे. मनात असंही येत असे की, या औषधांमुळं तर सुशांत सर पडून राहत नाहीत ना. रियानं सुशांतचा सर्व जुना स्टाफ बदलला होता. फक्त मीच शिल्लक राहिलो होतो जो सुशांत सरांच्या जवळ असायचो.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like