धक्कादायक ! कुटुंबियांना बाहेर बसवून तांत्रिकाकडून मुलीवर बलात्कार

गुजरात : वृत्तसंस्था – अल्पवयीन तरुणी सतत आजरी पडत असल्याने, तिच्या पालकांनी तिला तांत्रिका कडे नेले. पालकांना तांत्रिकाने सांगितले की तुम्ही बाहेर बसा आतमध्ये तिच्यावर उपचार करतो. थोड्याच वेळात आतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला तेवढ्यात पालकांनी झोपडीकडे धाव घेतली. झोपडीत ती तरुणी कपड्यांविना पलंगावर पडली होती. हा धक्कादायक प्रकार गुजरात मधील पाटन येथील आहे.

सदरील तरुणी दलित कुटुंबातील असून सतत आजारी असायची. पालकांनी तिला बऱ्याच ठिकाणी उपचार करण्यासाठी घेऊन गेले मात्र त्याच उपयोग झाला नाही. तरुणीची तब्येत खालावत असल्याने पालक तिला घेऊन राधपूरमधील एका तांत्रिकाकडे पोहचले. तांत्रिकाने तिच्या पालकांना पाच रविवार येण्यास सांगितले, परंतु तरुणीला पाहिल्याने तांत्रिकाची मनस्थिती बदली. आणि शुक्रवारी रात्रीच तरुणीला घेऊन येण्यास सांगितले.

तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे तरुणीच्या पालकांनी शुक्रवारीच त्याची झोपडी गाठली. तांत्रिक आणि त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदाराने तरुणीला मागील झोपडीत घेऊन गेला आणि पालकांना बाहेर थांबण्यास सांगितले. मात्र थोड्याच वेळात आतून तरुणीचा मोठ्याने किंचाळण्याचा आवाज ऐकताच पालकांनी झोपडीकडे धाव घेतली आणि आता पहिले तर तरुणी पलंगावर बेशुद्ध अवस्थेत पडली होती तिच्या अंगावर कपडे नव्हते व पलंगावर रक्त सांडले होते. तंत्रिक आणि त्याच्या साथीदाराने तिथून पलायन केले होते. पालकांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आपल्या मुलीला रुग्णालयात दाखल करुन त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून लगेच ढोंगी तांत्रिक बाबा आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरु केला.