Pune Crime | धक्कादायक ! 46 वर्षीय पत्नीला मित्रांसोबत झोपण्यास भाग पाडले, पती ‘त्या’ ठिकाणी उभा राहून पाहत होता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दोन मित्रांसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वत: त्या ठिकाणी उभा राहून पाहत (Watching) होता. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती (Husband) आणि त्याच्या दोन साथिदारांवर (Friend) IPC 376, 377, 370, 498 (अ), 114, 109, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत 48 वर्षाच्या विवाहित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2020 आणि जुलै 2021 मध्ये घडला आहे. पीडित महिलेने मंगळवारी (दि.17) फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पतीसह त्याच्या इतर दोन साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसताना डिसेंबर 2020 मध्ये हडपसर (Hadapsar) येथील एका लॉजवर एका मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरातील एका फ्लॅटवर आणखी एका मित्रासोबत पत्नीला अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. धक्कादायक म्हणजे हे सर्व होत असताना आरोपी पती त्याठिकाणी उभा राहून पाहत होता. अखेर पतीच्या त्रासाला वैतागून महिलेने मंगळवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कर्चे (PSI Karche) करीत आहेत.

 

 

Web Title :- Shocking The 46 year old forced his wife to sleep with friends while the husband stood and watched

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा