खळबळजनक ! ब्लॅकमेलिंगला वैतागून महिलेचा खून, मृतदेह पुरला शेतात

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – अगदी चित्रपटाला शोभेल असा खळबळजनक प्रकार अंबाजोगाई तालुक्यात समोर आला आहे. महिला बलात्काराची तक्रार देण्याची भिती दाखवून पैशांची मागणी करत असल्याने तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह चक्क शेतात पुरला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथे उघडकिस आला आहे. त्याने खून करून महिलेचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथे पुरल्याचे समोर आले आहे.

कविता कुंडलिक चव्हाण (वय २२, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मोहन भीमराव राठोड याला याला पोलिसांनी याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

महिला करत होती ब्लॅकमेल

कविता चव्हाण मोहनला पैशांची मागणी करत होती. पैसे नाही दिले तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी ती सतत मोहनला देत होती. त्यामुळे तो पुरता वैतागला होता. त्यानंतर त्याने पांडूरंग रावसाहेब पवार याच्यासोबत तिचा खून करण्याचा कट रचला.

शिराढोणच्या शेतात पुरला मृतदेह

मोहनने कविताला १० हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्याने तिला भाऊजींकडून पैसे घेऊन देतो असे सांगितले. १२ मे रोजी तो तिला सायंकाळी ७ च्या सुमारास दुचाकीवरून घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण या गावी गेला. त्यानंतर तेथे एका शेतात गेल्यावर त्याने तिचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मध्यरात्री त्याने पांडूरंगच्या मदतीने तिचा मृतदेह शेतात पुरुन टाकला.

कविता बेपत्ता झाल्याच्या तक्रारीने केला उलगडा

कविता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी १२ मे रोजी केली. बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी पोलीस फौजदार तपास करत असताना त्यांना यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. त्यानंतर तपासात मोहन राठोड याने खून केल्याचे समोर आले. पोलिसांनी मोहनला बेड्या ठोकल्या असून त्याचा मित्र पांडूरंग पवार याचा शोध सुरु आहे.

Loading...
You might also like