धक्कादायक ! गॅस गळतीमुळे घराला लागली आग, आईसह दोन मुलांचा होरपळून मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – गॅस गळतीमुळे घराला लागलेल्या आगीमध्ये आई आणि दोन लहान मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील तरंगफळ येथे घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आई दोन मुले गंभीरित्या भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई सोनल ज्ञानेश्वर शिंदे (वय-30) सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय-7), कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय-5) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. आई सोनल या सकाळी स्वयंपाक करत होत्या. काही कामाने त्या बाहेर गेल्या होत्या. घरात अचानक गॅस गळती झाल्याने आगीचा भडका उडाला. आगीचा भडका उडला त्यावेळी दोन्ही मुलं घरात झोपली होती. सोनल झोपलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी घरात गेल्या. मात्र, आगी वाढत गेल्यामुळे त्या तिघांना घरातून बाहेर पडता आले नाही.

गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट होईल या भीतीने कोणत्याही व्यक्तीने घरात जाण्याचे धाडस केले नाही. दरम्यान, गावातील नामदेव कांबळे आणि पप्पू कांबळे यांनी धाडस दाखवून लोकांच्या मदतीने पाठीमागील भिंत पाडून दोन लहान मुले आणि आईला बाहेर काढलं. तिघेही जास्त भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत त्यांना अकलूज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला होता.

आई आणि मुलगा कृष्णा हे जास्त भाजल्याने त्यांना सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. त्यावेळी कृष्णाचा मृत्यू झाला. आई सोनल यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like