धक्कादायक, भरदिवसा इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेची हत्या

नांदेड (कनवट) : पोलीसनामा ऑनलाईन

किनवट गोकुंदा येथील शांतीनिकेतन इंग्रजी शाळेच्या प्राचार्या सुरेखा विजय राठोड (35 वर्षे) यांची आज गुरूवारी (दि.२३) सकाळी अज्ञात मारेकऱ्यांकडून तिक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना गोकुंदा येथील शिवनगरी कॉलनीतील त्यांच्याच सेवासदन या निवासस्थानी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी किनवट पोलिसांनी मयत महिलेचे पती प्रा.विजय राठोड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44ca66fc-a6ef-11e8-a242-a3e08076e998′]

गोकुंदा येथील शांतीनिकेतन इंग्रजी शाळेच्या प्राचार्या सुरेखा विजय राठोड या दररोज सकाळी 10 च्या सुमारास शाळेत जात असतात. आज गुरूवारी (दि.23) सकाळी दहा वाजून गेले तरी मॅडम अजून शाळेत आले नाहीत, म्हणून त्याच शाळेतील एक शिक्षक राहुल वाढे यांनी साडेदहाच्या दरम्यान सुरेखा राठोड यांना फोन केला असता, फोनवर त्यांचा आवाज फारच दबक्या आवाजात येत होता. आवाज नीट ऐकू येत नाही म्हणून त्या शिक्षकाने फोन ठेऊन दिला.

त्यानंतर दररोजच्या प्रमाणे भांडे व कपडे धुणारी मोलकरीण बाराच्या नंतर घरी गेली असता, घरातील मुख्य दरवाजाच्यावरही आवाज दिल्यानंतर आतून काहीच प्रतिसाद न आल्याने, मोलकरीण दार ढकलून आत गेली. पूर्ण घर तपासल्यानंतर मुलांच्या बेडरूममध्ये सुरेखा राठोड ह्या मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांचा गळा चिरलेला होता. हातावर जखमा होत्या. पूर्ण खोलीभर अस्ताव्यस्त सामान व झटापट झाल्याच्या खुणा होत्या. हे भीषण दृश्य पाहून घाबरून गेलेल्या मोलकरनीने बाहेर पडून आरडा ओरडा केल्याने शेजारी-पाजारी जमा झाले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. तपासात पोलिसांना घटनास्थळी नांदेड येथील डायमंड टेलर यांनी शिवलेला पांढरा शर्ट सापडला. अधिक तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4b159436-a6ef-11e8-b421-5fe52ccec6b6′]

शांतीनिकेतन शाळेच्या प्राचार्या ह्या आपले पती प्रा.विजय राठोड सोबत गोकुंदा येथील शिवनगरी ह्या उच्चभ्रू कॉलनीत राहात होते. प्रा.विजय राठोड हे वानोळा येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सदरील घटनेनंतर तुर्तास चौकशीसाठी किनवट पोलिसांनी प्रा.विजय राठोड यांना ताब्यात घेतले आहे. मयत सुरेखा राठोड व त्यांचे पती विजय राठोड हे दोघेही मुखेड तालुक्यातील असल्याचे समजते.