धक्कादायक …!अवघ्या चार दिवसांच्या मुलीची वडिलांनी केली चाकूने भोसकून हत्या

गांधीनगर : पोलीसनामा ऑनलाईन

आज जगभारात मुली विविध कार्यक्षेत्रात मोठमोठ्या पदावर नावलौकिक मिळवत आहेत. पण मुलींना अजूनही ओझे समजणाऱ्यांची कमी नाही. आता  पाच मुलींनंतर सहावी मुलगीच झाली म्हणून केवळ चार दिवसांच्या नवजात मुलीची जन्मदात्या वडिलांनीच चाकूने भोकसून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक  घटना गांधीनगर येथील मोती मसंग या गावातील आहे. या आरोपीचे नाव विष्णु राठोड असे असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी विष्णू आणि त्याची पत्नी विमला या दोघांचे लग्न दहा वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना पाच मुली आहेत. मात्र मुलगा व्हावा याकरिता विष्णू आग्रही होता. विमला सहाव्यांदा गरोदर राहिल्यानंतर विष्णूला यावेळेला तरी मुलगा होईल असे वाटले. मात्र पुन्हा मुलगी झाल्याचे समजले. त्यामुळे  तो पत्नीला भेटायला देखील गेला नाही. अखेरीस रविवारी विष्णू आपल्या पत्नीला आणि मुलीला भेटायला गेला. तेव्हा रागाच्या भरात कोणताही विचार न करता त्याने चार दिवसांच्या बळावर चाकूने वार केले. त्यानंतर बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण घाव एवढे जबरदस्त  होते की, यात या नवजात बाळाचा मृत्यू झाला. तिच्या अंगावर झालेल्या जखमांमुळेच तिचा अंत झाला असे सरकारी रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f90077c4-7889-11e8-8e84-1dcac3cb5170′]

या घटनेनंतर लगेचच पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी विष्णू राठोड याला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. विष्णुच्या सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांच्या मुलीवर वार करून विष्णु पळून जाण्याच्या तयारीत होता, पण माझ्या मुलीने आरडाओरड करून विष्णुने मुलीला ठार मारल्याचे सांगितले, त्यानंतर शेजाऱ्यांनी विष्णुला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.