धक्कादायक! मनोरुग्ण मुलाने चाकू खुपसुन फोडले आईचे डोळे

चिंचवड: पोलीसनामा आॅनलाईन

मनोरुग्ण मुलाने वयोवृद्ध आईच्या दोन्ही डोळ्यात चाकू खुपसुन डोळे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी येथे घडली. घटनेनंतर ३५ वर्षीय मुलगा फरार झाला आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड पोलिसांना याची माहिती मीळाली. सुमन विजय सावंत वय-७५ असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. तर भुपेंद्र विजय सावंत असे मनोरुग्ण मुलाचे नाव आहे.

सविस्तर माहीती अशी की, शनिवारी दुपारी आई सुमन विजय सावंत वय-७५ रा.गुरुद्वाराजवळ वाल्हेकरवाडी,चिंचवड. या मुलासह घरात एकट्याच होत्या, भुपेंद्रने अचानक हातात चाकू घेऊन वयोवृद्ध आईच्या दोन्ही डोळ्यात चाकू खुपसला आणि भुपेंद्र फरार झाला. काही वेळानंतर शेजाऱ्यांपर्यंत घटना घडल्याचे लक्षात आले. आणि जखमी सुमन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच भुपेंद्रला येरवडा मनोरुग्णालयामधून आणले होते. दोन-तीन दिवस तो घराच्या बाहेरच असायचा. वडील विजय सावंत हे मुंबई येथे असतात, तर मुलगी नाशिकला असते. त्यामुळे मनोरुग्ण मुलगा आणि आई सुमन याच घरी होत्या. चाकू खुपसल्यानंतर बराच वेळ त्या एकाच जागेवर बसून होत्या. त्यांना काहीच समजत नव्हते, मात्र वेळीच शेजाऱ्यांनी पाहिल्याने त्यांचा जीव वाचला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.