धक्कादायक…. एसएनडीटी हॉस्टेलमध्ये वॉर्डनने विद्यार्थिनीला नग्न केले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्लिवलेस कपड़े घातल्याचे पाहून वॉर्डनने विद्यार्थिनीला एका खोलीत नेले आणि तिला चक्क नग्न केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईतील जुहूच्या एसएनडीटी होस्टेलमध्ये रविवारी घडला आहे. पीडित विद्यार्थिनीने तात्काळ सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी महिला वॉर्डन विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6fffaef0-cfce-11e8-b60b-2512b71ff548′]

आज (रविवारी) दुपारी एसएनडीटी कॉलेज आणि हॉस्टेल परिसरात मुलींना स्लिवलेस ड्रेस परिधान करण्यास परवानगी नसताना हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या एक विद्यार्थिनीने शरीरावर व्रण असल्याने आणि डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे स्लिवलेस ड्रेस घातला होता. होस्टेलचा नियमभंग केला म्हणून हॉस्टेलच्या वार्डन ने तिला त्याबद्दल जाब विचारला. व्रण दाखव म्हणून वॉर्डनने मला अंगातील कपडे काढायला लावल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75005a0c-cfce-11e8-afc5-dd2b1b427da4′]
ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर सुमारे १०० ते १५० विद्यार्थिनीने या विरोधात आंदोलन सुरु केले. त्यांनी याबाबत महाविद्यालयाला पत्र देत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान, याप्रकरणी रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास महिला वॉर्डन विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगांवकर यांनी दिली आहे. महिला वॉर्डन ने अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अलीकडील काळात होस्टल वॉर्डनबद्दलच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे.