पंचायत समितीमध्ये घडला धक्कादायक प्रकार ! ग्रामसेवकाने कर्तव्यावर असलेल्या कनिष्ठ सहाय्यकास शिवीगाळ,मारहाण

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड पंचायत समिती मध्ये काम करत असणारे कनिष्ठ सहाय्यक राजेश मल्हारी घोलप यांनी चौकशी करीता फोन केला असता ग्रामसेवक संदीप जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन कार्यालयात काम करत असलेल्या घोलप यांना एन. डी. बांगारा सहाय्यक प्रशासन अधिकारी, एस ए खंडागळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, व्ही बी म्हारसे वाहन चालक व इतर उपस्थित कर्मचाऱ्यांन समोर मारहाण, शिवीगाळ, धमकावले असता तातकाळ घोलप यांनी पत्र देऊन पंचायत समिती प्रवेशद्वारा मध्येच आपल्या न्याय हक्का साठी उपोषण सुरू केले.

मुरबाड पंचायत समिती मध्ये घडलेला प्रकाराणे चाऱ्यांच्या सुक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासकीय कार्यालयात जाऊन कामकरत असलेल्या अधिकाऱ्यांन धमकावून ही कारवाही न झाल्याने अखेर कर्मचाऱ्यांने उपोषणाचा मार्ग स्वीकारला संबंधित मुजोर ग्रामसेवका वर निलंबनाची कायदेशीर कारवाही होत नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा पवित्रा घेतला आहे.

अनेक ग्रामपंचायतीन वर काम करणारे ग्रामसेवक जर अधिकाऱ्यांन बरोबर अशा प्रकारची गलिच्छ वागणूक धमक्या देन्या पर्यंत मजल पोहचली असून सामन्य नागरिकांन समवेत काशाप्रकारची वागणूक देत असतील विचारही करू शकत नाहीत जोपर्यंत कारवाही होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे नाही घोलप यांनी भूमिका घेतली आहे.