अरे बापरे ! ‘या’ ठिकाणी हायटेक चोरट्यांसाठी ‘कारचोरी’चा ‘क्रॅशकोर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीमधील एनसीआर येथील कार चोर हायटेक बनले आहेत. या कार चोरांनी कारचोरीचे खास ट्रेनिंग घेतले असून हायटेक चोरांना कारचोरीसाठी बंगळुरू येथे क्रॅशकोर्स असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे चोरटे कार चोरीसाठी लॅपटॉपचा उपयोग करत असल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या एका हायटेक चोरट्याने कबुली दिली. प्रशिक्षण घेतलेले चोरटे आपल्या लॅपटॉपच्या सहाय्याने कारचा दरवाजा उघडतात. कारचा दरवाजा उघडण्यासाठी या हायटेक चोरट्यांना चावीची गरज पडत नाही. कारचे सिक्युरिटी सिस्टीमच हॅक करण्याचं तंत्रज्ञान ते शिकले आहेत.

पोलिसांनी एनसीआर येथून एका चोरट्याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची मास्टर की सापडली नाही. कार चोरी करणाऱ्या ठरावीक चोरट्यांकडेच मास्टर की असते. सध्या दहा लाखांपेक्षा अधिकच्या महागड्या कारमध्ये दरवाजा आणि इंजिन हे एका सॉफ्टवेअरच्या मदतीने लॉक आणि अन लॉक करण्यात येत असल्याचे एका ऑटो तज्ज्ञाने म्हटले आहे. त्यामुळे चावीशिवाय हे चोरटे गाडीचा उघडू शकतात.

एनसीआर येथे मागील अनेक दिवसांपासून पोलिसांनी कार चोरी करणाऱ्यांवर कारवाई करत अनेकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महागड्या गाड्यांमध्ये कॉम्प्युटरवाली ऑटो लॉक सिस्टीम बसवण्यात येते. हे सॉफ्टवेअर सिस्टीम उघडण्याचं ट्रेनिंग काही चोरट्यांनी बंगळुरू येथे जाऊन घेतले आहेत. त्यासाठी २५ हजार रुपयांची फी आकारण्यात येत असून या चोरट्यांना ३५ ते ४० हजार रुपयांमध्ये एक डिव्हाईसही देण्यात आले असल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like