Shocking ! 10 व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली जुळी मुले, Live Streaming मध्ये रमलेल्या आईला ओरडण्याचा आवाजही आला नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Shocking | सोशल मीडिया (Social Media) चे व्यसन मनुष्याचे वैयक्तिक जीवन कशाप्रकारे बरबाद करू शकते, हे जाणून घ्यायचे असेल तर रोमानिया (Romania) मध्ये घडलेल्या एका दुर्घटनेची हकीकत प्रत्येक आई-वडिलांनी ऐकली पाहिजे. येथे Facebook वर व्यस्त एका महिलेचे संपूर्ण जग उध्वस्त झाले (Shocking) आणि तिला याबाबत काहीच कल्पना नव्हती.

रोमानिया (Romania) मध्ये राहणारी एक महिला ज्यावेळी फेसबुक (Facebook) वर Live Streaming करण्यात गुंतली होती, त्यावेळी तिची जुळी मुले दुसर्‍या खोलीत खेळत होती.
आई Social Media वर लोकांशी बोलत राहिली आणि 2 वर्षांची निष्पाप जुळी मुले 10व्या मजल्यावरून खाली पडली.
हैराण करणारी बाब म्हणजे तोपर्यंत आईला या गोष्टीची कल्पनाही नव्हती.

The Sun मध्ये प्रसिद्ध या वृत्तानुसार, ही भयंकर घटना रोमानियाच्या प्लॉयस्टी शहरात घडली.
येथे 2 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई एंड्रिया वायलेट पेट्रीस (Andreea Violeta Petrice) घरात Live Streaming मध्ये मग्न होती.
या दरम्यान तिची जुळी मुले मोईस क्रिस्टियन पेट्रीस आणि बीट्राइस-एरिका पेट्रीस खेळताना 10व्या मजल्यावरून खाली पडली.
यापेक्षाही भयंकर म्हणजे, जेव्हा घरी पोलीस आले तेव्हा एंड्रियाला समजले की मुले खाली पडली आहेत.

 

पोलीस जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी Live Chat बंद केले आणि मुलांच्या मृत्यूची माहिती दिली.
एंड्रियाने यानंतरही स्वता निर्दोष असल्याचे म्हटले.
तिने म्हटले दोन्ही मुले मित्राच्या देखरेखीत होती आणि ती मोठ्या मुलासोबत दुसर्‍या खोलीत होती.

ती हे सुद्धा म्हणाली की, मुले खिडकीपर्यंत चढू शकत नव्हती. मात्र, शेजार्‍यांनी सांगितले की, मुले खिडकीवर चढली होती.
एंड्रियाच्या मित्राने आपल्यावरील आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर एंड्रियावर खुप टिका होत आहे.

 

Web Title : Shocking | twins-fell-down-from-10th-floor-while-mother-was-busy-in-facebook-live-streaming

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक, बड्या बिल्डरसह 5 जणांवर FIR

सुखवार्ता ! SBI बँकेनं केली व्याज दरात कपात; आता होम, ऑटो अन् पर्सनल लोनसह इतर कर्जावरील EMI भरावा लागेल कमी

Delhi Police | दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन सक्सेस; PAK चा मोठा कट उधळला ! स्फोटकांसह 6 दहशतवाद्यांना केली अटक