धक्कादायक ! मॅच ‘फिक्सिंग’मध्ये दोषी आढळल्याने ‘या’ दोघा सख्या भावांवर ‘आजीवन’ बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. त्यामुळे आता हे दोन खेळाडू भविष्यात पुन्हा कधीही क्रिकेट खेळू शकणार नाहीत. या दोन खेळाडूंवर आयसीसीला फिक्सिंगचा संशय होता. त्यामुळे या दोघांची चौकशी करण्याचे आदेश भ्रष्टाचारविरोधी पथकाला देण्यात आले होते. या चौकशीत हे दोघे दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आयसीसीने हि कारवाई केली आहे.

हाँगकाँगकडून खेळणारे नदीम अहमद आणि इरफान अहमद यांच्यावर हि कारवाई करण्यात आली असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. या दोघांचा जन्म पाकिस्तानात झाला असून 2008-09 मध्ये नदीम हॉंगकाँगचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. या दोघांवर देखील आजीवन बंदी घालण्यात आली असून संघातील दुसरा खेळाडू हसीब अमजदवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यातील नदीम अहमद हा फिरकीपटू असून त्याने 25 एकदिवसीय आणि 24 ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत. 2004 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यांत पदार्पण केले होते. तर त्याचा भाऊ इरफान हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने सहा एकदिवसीय आणि आठ ट्वेन्टी-20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, याआधी देखील अशा प्रकरणात अनेक खेळाडूंवर कारवाई झाली असून एकाचवेळी दोन भावांवर आजीवन बंदीची कारवाई होण्याची हि क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

आरोग्यविषयक वृत्त –