पुण्यातील धक्कादायक प्रकार : पोलीस उप निरीक्षकाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात बुलेट चालवून सायलेंसरमधून फटाक्यांचे आवाज काढणाऱ्या टवाळखोर टोळीवर कारवाई करत असाताना पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. या घटनेत सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक लुईस अँन्थोनी मकासरे आणि पोलीस शिपाई कर्चे हे जखमी झाले आहेत. हा प्रकार सोमवारी (दि.७) रात्री साडेअकराच्या सुमारास महात्मा गांधी चौक ते तळजाई वसाहत दरम्यान घडला.

पोलीस उप निरीक्षक लुईस अँन्थोनी मकासरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी चार जणाविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक मकासरे आणि पोलीस शिपाई कर्चे हे तळजाई परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी विणकर सभागृहाकडून दोन बुलेट मोटर सायकलवर चारजण जात होते.

या बुलेट मोटार सायकलच्या सायलेन्सरमधून फटाख्यासारखे मोठ मोठा आवजा करुन सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरड करत जात होते. त्यावेळी मकासरे आणि कर्चे यांनी त्यांचा पाठलाग केला. चारजण पद्मावती येथे त्यांच्याकडे चौकशी करत असताना आरोपींनी मकासरे आणि कर्चे यांना मारहाण केली. या मारहाणीत पोलीस उप निरीक्षक मकासरे यांच्या डोळ्याला मार लागला आहे. याप्रकरणी मकासरे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक के.बी. जाधव करीत आहेत.