पाकिस्तानी TikTok स्टारला दुबईत लाथांनी ‘मारहाण’, व्हिडीओ शेअर करून व्यक्त केलं दुखः (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन : पाकिस्तानची टिक टॉक स्टार हरिम शाह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दुबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हरिमला जमावाकडून रोषाला सामोरे जावे लागले आहे. स्वतः हरीमने हा व्हिडिओ सोशल मीडियावर सामायिक करुन खंत व्यक्त केली आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते त्याच्याबद्दल सहानुभूती दर्शवित आहेत, तर काही लोक या व्हिडिओद्वारे तिची चेष्टा करत आहेत.

https://twitter.com/_Hareem_Shah/status/1206482845314748416

अलीकडेच पाकिस्तानी टिक टॉक स्टार हरीम शाह मॉल शोसाठी दुबईला पोहोचली. यादरम्यान काही लोकांनी तिला ढकलले. हरीम म्हणाली की, ‘दुबईतील ओएसिस मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. तिथे शेकडो पाकिस्तानी तरुणांनी मला ढकलले, शिवीगाळ केला आणि काहींनी तर मला लाथाही मारल्या. तुम्ही तुमच्या स्त्रियांशीही असेच वागता?

तसेच, एका मुलाखतीदरम्यान हरीम म्हणाली, ‘कोणतीही स्त्री अश्या प्रकारच्या घटना सहन करणार नाही. दुर्दैवाने पाकिस्तानमध्ये अशा घटनांबाबत कोणताही कायदा नाही. ‘हरीमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, यापूर्वीही हरीम छळाचा बळी पडली आहे. किंबहुना एका कार्यक्रमादरम्यान तिच्याशी फोटो घेण्याच्या बहाण्याने तरुणांनी वेढले होते. त्यावेळी एका युवकाने तिचा हात धरला आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती वेळेत त्या व्यक्तीपासून दूर गेली.”

महत्त्वाचे म्हणजे हरीम सुमारे दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या कक्षात टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी वादात सापडली होता. या विषयावर जोरदार चर्चा झाली आणि त्यांना टिक टॉक व्हिडिओसाठी परवानगी कशी मिळाली, असे प्रश्न विचारले गेले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/