संतापजनक ! Facebook मित्रांच्या मदतीनं त्यानं पत्नीवरच केला सामूहिक बलात्कार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जोगेश्वरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. पतीने मित्रांच्या सहाय्याने पत्नीचा सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. फेसबुकवर ओळख झालेल्या दोन मित्रांच्या सहाय्याने 23 वर्षीय सामूहिक बलात्कार नवऱ्यानेच घडवून आणला. 25 वर्षीय आरोपी पतीला जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील मुख्य आरोपी रिक्षा चालक असून तो पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे दोन साथीदार मुंबईत एका फार्मा कंपनीमध्ये नोकरीला आहेत.

आरोपी चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला जोगेश्वरी येथे घेऊन गेला. त्यानंतर तो पत्नीला जोगेश्वरीत एका झोपडपट्टीत घेऊन गेला. तेथे अभिषेक आणि मंगेश यादव हे त्याचे दोन मित्र आधीपासूनच हजर होते. फेसबूकवरुन आरोपींची ओळख झालेली होती असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने त्याच्या दोन्ही मित्रांना पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितला, त्यानंतर त्याने देखील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती केली. या दुर्दैवी घटनेनंतर पत्नी पालघर पोलीस ठाण्यात पोहचली. तिने घटना सांगत तक्रार नोंदवली. त्यानंतर पालघर पोलिसांनी हे प्रकरणा जोगेश्वरी पोलिसांकडे हस्तांतरित केली. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली. परंतु पत्नीने जानेवारी महिन्यात तक्रार नोंदवण्यासाठी पालघर पोलिसांनकडे अर्ज केला होता. भारतीय दंड विधासहिंता 376 – ड (सामूहिक बलात्कार) अन्वये दाखल गुन्हाखाली तिन्ही आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. आरोपींना आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like