धक्कादायक ! पत्नीला दारू पाजून मित्रांसह केला सामूहिक बलात्कार

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – पत्नीला जबरदस्तीने दारू पाजून मित्रांसह पतीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये उघडकीस आली आहे. या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामुळे केरळमध्ये खळबळ उडाली आहे. हे घृणास्पद कृत्य महिलेच्या पतीनेच केल्याचे समोर आले आहे. ही घटना तिरुअनंतपुरमच्या हद्दीत कादिनामकुलमजवळ घडली आहे. गुरुवारी रात्री महिलेवर निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, पती आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली. दारू पाजल्यानंतर एका निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही तक्रार मिळताच पीडितेच्या पतीसह पाच जणांना गुरुवारी (दि.4) रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, ती कशीबशी या नराधमांच्या तावडीतून सुटली आणि मुख्य रस्त्यावर पोहचली. जिथे तिची रस्त्यावरून जाणाऱ्या कारला जोरात धडक बसताना वाचली. पतीसह सर्व आरोपींविरोधात विविध गुन्ह्यांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राजस्थानमधील बाडमेर शहरात देखील एक खळबजनक घटना घडली आहे. या ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन मुलींवर जवळपास दोन वर्षापासून शेजारी राहणारा नराधम बलात्कार करत होता. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी असल्याचा फायदा घेत या नराधमाने मुलींना फसवून घरात नेले. त्या ठिकाणी त्यांचे अश्लील फोटो काढले, त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करत होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like