धक्कादायक…..बंदुकीचा धाक दाखवून पत्नीनं कापले पतीचे कान

कोलकत्ताःपोलीसनामा आॅनलाईन

बंदुकीचा धाक दाखवून एका महिलेनं आपल्याच पतीच्या कानाचे चाकूने तुकडे केल्याची धक्कादायक घटना कोलकत्ता येथील नारकेलडांगा भागात घडली आहे. मोहम्मद तन्वीर असे पीडित व्यक्तीचं नाव आहे. तन्वीरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस  तक्रार दाखल केली आहे.

[amazon_link asins=’B077PWK5BT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8af6f86-8b38-11e8-b754-d172c041d303′]

याबाबात सविस्तर वृत्त असे की, तन्वीरचं दोन वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा वयानं दुप्पट असलेल्या मुमताज बीबी हिच्याशी लग्न झालं होते. लग्नानंतर मुमताज आणि तिच्या नातेवाईकांनी तन्वीरचा छळ करण्यास सुरूवात केली. मुमताजच्या छळाला कंटाळून तन्वीर घर सोडून मलिकपूरला पळून गेला. मात्र मुमताज आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडून पुन्हा नारकेलडांगा इथ आणलं. त्यातून वाद झाला. यावेळी संपातपलेल्या मुमताजनं तिच्या साथीदारांसह तन्वीरला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्यावर चाकूनं वार केले. त्यात त्याचे कान कापले गेले. तन्वीर मरण पावल्यानं समजून मुमताज आणि तिच्या साथीदारांनी तिथून पळ काढला.

मुमताजनं तन्वीरला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून तन्वीरच्या आईनं तिच्या नावावर असलेली जमीन विकून मुमताजला पैसेही दिले. तरी देखील मुमताजनं तन्वीरला तिच्यापासून वेगळं होण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे यातूनच त्यांचे वाद विकोपाला गेले.