धक्कादायक ! कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार

हैद्राबाद : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी हैद्राबादमध्ये डॉक्टर तरूणीवर सामुहिक बलात्कार करून नंतर तिला जाळण्यात आले होते, यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटना अजूनही सुरूच आहेत.

हैद्राबादमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका 23 वर्षीय विवाहित महिलेवर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना आता घडली आहे. रविवारी पीडितेने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. ही घटना शुक्रवारी (ता.6) घडली होती. पीडित महिला चंदनवेली या तिच्या गावात जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यावेळी 33 वर्षीय आरोपीने तिला लिफ्ट दिली.

परंतु, पीडित महिलेला चंदनवेली येथे सोडण्याऐवजी आरोपी तिला एका निर्जनस्थळी गाडीतून घेऊन गेला. तेथे पोहचल्याने त्याने जबरदस्तीने कारमध्ये महिलेवर बलात्कार केला. पीडितने सर्व प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली. पीडित महिलेने शनिवारी तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. हा आरोपी महिलेच्याच गावातील आहे.